पुणे (प्रतिनिधी) – शहरातील सोमवार पेठ परिसरात असलेल्या दत्त मंदीरातून चोरट्यांनी पितळी तांबे, पूजेचे साहित्य असा मिळून दोन हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २३ ऑक्टोबरला मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुनील माने (वय ५८) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री संत गाडगे महाराज ट्रस्टचे सोमवार पेठेत दत्तमंदीर आहे. सुनील माने दत्त मंदीराचे व्यवस्थापक आहेत.
२३ ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदीराचा दरवाजा तोडून ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. जे. नरळे तपास करीत आहेत.