नवी दिल्ली – स्वीडनच्या उच्चस्तरीय क्लब हैमार्बी आयएफविरुद्ध झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाला आघाडीनंतरही पराभव पत्कारावा लागला. सामन्यातील शेवटच्या मिनिटात आत्मघातकी गोल झाल्याने हैमार्बी आयएफने 3-2 असा विजय मिळविला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक चाली रचत हैमार्बी आयएफवर दबाव निर्माण केला. इंदुमतीने 30व्या मिनिटाला गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण सहा मिनिटांनंतर नीना जेकबसन (36व्या मिनिटाला) गोल करून बरोबरी साधली.
ही बरोबरी मनीषा पन्नाने 40व्या मिनिटाला गोल करत भारताला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.या संघर्षपूर्ण सामन्यात अमांडा सुंडस्ट्रॉमने 52व्या मिनिटाला यजमान संघाला पुन्हा बरोबरी साधून दिली.
दरम्यान, शेवटच्या शिट्टीच्या 12 मिनिटे आधी जेकबसनने संघासाठी चांगली चाल केली. पण रंजना चानूच्या पायाला लागून चेंडू गोलच्या आत गेला आणि तो आत्मघातकी गोल ठरला.