नगर – राहुरी फॅक्टरी येथील मुसमाडे यांच्या पेट्रोलपंपावर लावलेला हायवा ढंपर चोरुन नेणारा मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रकाश एकनाथ कदम (रा. साकुरी, ता. राहाता, जि. नगर), असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार व सी. सी. टीव्ही फुटेज पडताळणी केली असता हायवा ढंपरचे जी. पी. एस. वरुन माहिती घेत सदर ढंपरचे जी. पी. एस. हे खडका फाटा नेवासा येथे बंद झाल्याचे दिसुन आले. त्यानुसार पथकाने रोडचे फुटेजची पाहणी केली असता फुटेजमध्ये सदरचा ढंपर हा राहुरी, घोडेगांव, नेवासा फाटा, वाळुंज पंढरपुर, वैजापुर मार्गे शिर्डी परिसरामध्ये दिसुन आला.
पथकाने शिर्डी परिसरामध्ये फुटेजमध्ये संशयीरित्या दिसुन येत असलेल्या इसमाची ओळख पटवुन त्याचे हा गुन्हा प्रकाश एकनाथ कदम याने त्याचे साथीदार समीरखान नसिरखान पठाण, रा. खंडाळा, ता. वैजापुर, जि. छ. संभाजीनगर) व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदारांनी केला असल्याचे समोर आले. व सदरचा ढंपर हा नाला नंबर ३२ वरील जाधव वस्ती जवळ, रुई शिवार, ता. राहाता, जि. नगर या ठिकाणी असलेल्या काटवनात लावलेला असल्याचे तपासात पुढे आले. ही कारवाई गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदिवे, संतोष लोढे, संदीप चव्हाण, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने केली.