दुबई – सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला करोनाची बाधा झाल्यामुळे अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या या दुसऱ्या पर्वातील उर्वरित सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र, याबाबत चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच उमरान मलिक याची नटराजनच्या जागी संघात निवड करण्यात आली आहे. नटराजनला करोनाची बाधा झाल्यामुळे त्याला विलगीकरणात ठेवले आहे.
त्यामुळे कन्क्युजन खेळाडू म्हणून जम्मू काश्मीरच्या उमरान मलिकला संघात स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी उमरान मलिकने जम्मू काश्मीरसाठी एक टी-20 सामना खेळला आहे.