दुबई – मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती येत्या काळात भारतीय संघाच्या गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र बनेल व तोच संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे ट्रम्पकार्ड ठरेल, अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नवोदित गोलंदाज वरुण चक्रवर्ती याचे कौतुक केले आहे.
सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला होता. या सामन्यात वरुणने अफलातून गोलंदाजी करताना कोहलीसह सगळ्याच प्रमुख फलंदाजांवर वर्चस्व राखले होते.
वरुणने खरोखर अचूक गोलंदाजी केली. डगआऊटमध्ये बसलेलो असताना वरुण भारतीय संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू ठरेल, असेही माझ्या सहकारी खेळाडूंशी बोलताना म्हणालो होतो.
भारतीय संघाला वरुणसारख्याच नवोदितांची गरज आहे. त्याच्यामुळे भारतीय संघाची बेंचस्ट्रेंथ जास्त सक्षक्त होणार असून ही भारतासाठी चांगली गोष्ट ठरणार आहे, असेही कोहली म्हणाला.