पालघर – पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीत एका टेक्सटाईल फॅक्टरीत स्फोटानंतर लागलेल्या आगीत एक जण ठार झाला तर अन्य पाच जण जखमी झाले.
जखमींपैकी काहीं जणांची प्रकृती गंभीर आहे. पहाटे सहा वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह पूर्ण जळाला असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड बनले आहे. या घटनेनंतर फॅक्टरीतील दोन कामगार बेपत्ता झाले आहेत, त्यांचा शोध सुरू आहे.
फॅक्टीच्या एका युनिट मध्येच हा स्फोट झाला. पण तो कशाने झाला हे समजले नाही. स्फोटानंतर फॅक्टरीच्या परिसरात अन्यत्र ही आग पसरली. ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आली होती. स्फोटाच्या कारणाचाहीं शोध घेतला जात आहे.