वॉशिंग्टन – भारत आणि अमेरिका यांच्यातील टू प्लस टू चर्चेची पुढील फेरी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी आज ही माहिती दिली. श्रृंगला हे तीन दिवसांच्या अमेरिका भेटीवर आले आहेत. त्यांनी या दौऱ्यात बायडेन प्रशासनातील अनेक वरीष्ट अधिकाऱ्यांशी द्विपक्षीय बाबींवर चर्चा केली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, टू प्लस टूची मागची फेरी भारतात झाली होती. आता ही नवीन फेरी अमेरिकेत होणार आहे. या चर्चेत दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री सहभागी होत असतात. सध्या अफगाणिस्तानात बरीच धामधुम सुरू आहे. तेथील स्थिती बाबत भारताची भूमिका महत्वाची असल्याने अमेरिका या बाबतीत सातत्याने भारताशी संपर्क ठेऊन आहे. नोव्हेंबरमधील चर्चेतही हाच प्रमुख मुद्दा असणार आहे.