भारताने श्रीलंकेला पाठवला दीडशे टन ऑक्‍सिजन

कोलंबो – श्रीलंकेत कोविडची सध्या तिसरी लाट आली असून तेथील रुग्णांचे प्रमाण वाढल्याने त्यांना ऑक्‍सिजनची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने त्यांना दीडशे टन ऑक्‍सिजन पाठवला आहे. हा ऑक्‍सिजन कोलंबोत पोहोचला आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्ष यांनी भारताला या ऑक्‍सिजन साठी व्यक्‍तिश: विनंती केली होती.

भारतीय नौदलाच्या शक्ती जहाजातून ऑगस्ट महिन्यातही श्रीलंकेला 100 टन लिक्वीड मेडिकल ऑक्‍सिजन पुरवण्यात आला होता. या खेरीज भारताने त्यांना औषधे आणि अन्य सामग्रीचाही पुरवठा वेळोवेळी केला आहे. सध्या श्रीलंकेत लॉकडाऊन पुकारण्यात आला असून त्याची मुदत 13 सप्टेंबरपर्यंत आहे.

श्रीलंकेत सध्या सक्रिय बाधितांची संख्या 4 लाख 47 हजाराच्यावर आहे. तसेच तेथील मृत्युचे प्रमाणही लक्षणीय आहे. परवा गुरूवारी एका दिवसात तेथे 9600 करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.