विशाल पुरीया दिग्दर्शित “फॉरेन्सिक’मध्ये राधिका आपटेबरोबर प्राची देसाईदेखील असणार आहे. “फॉरेन्सिक’हा 2020 मध्ये रिलीज झालेल्या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाच्या प्रत्यक्ष कामाला अलीकडेच सुरुवात झाली आहे.
प्राची देसाई यापूर्वी “सायलेन्स; कॅन यू हिअर मी?’ मध्ये मनोज वाजपेयीबरोबर होती. “फॉरेन्सिक’सारख्या सस्पेन्स थ्रिलरमध्ये प्राचीने आतापर्यंत काम केलेले नव्हते. त्यामुळे हा प्रोजेक्ट तिच्यासाठी स्पंशल आहे.
राधिका आपटेबरोबरच विक्रांत मेस्सी आणि रोहित रॉय देखील या सस्पेन्स थ्रिलरमध्ये असणार आहेत. ही आणखीन एक जमेची बाजू आहे. हे चौघेही एकमेकांना एनर्जी पुरवत असतात. दिग्दर्शक आणि लेखक मिळून अशी गोष्ट लिहीत आहेत की सर्व कलाकारांना देखील त्याची उत्सुकता लागून राहिली आहे, असे प्राची म्हणाली.
प्राची देसाईला टिव्हीवरून बिग बॅनर सिनेमामध्ये ही एक चांगली संधी असणार आहे. मल्याळम सिनेमाचा रिमेक असल्यामुळे यामध्ये टिपिकल साऊथ इंडियन ड्रामा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, हिंदी रिमेक करताना कथेबरोबर सिनेमाच्या सादरीकरणामध्येही मोठे फेरबदल केले जाऊ शकतात.