पुणे : मोक्कासारख्या गंभीर गुन्हयात फरारी असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र ब-हाटे याला आश्रय देणा-या वकिलाला पोलिसांनी अटक
केली. याच वकिलाच्या घरातून पोलिसांना आव्हान देणारे व्हिडिओ ब-हाटे याने सोशल मीडियावरून व्हायरल केले होते. मात्र शोध घेऊनही वकील पोलिसांना सापडत नव्हता. राज्यभर पोलीस शोध घेत असताना पुण्याजवळच तो अधिक काळ लपून बसला होता, अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
सागर संजय म्हस्के ( वय 32 रा.म्हस्के वस्ती, कळस आळंदी रस्ता) असे
अ़टक केलेल्या वकिलाचे नाव आहे. एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या
रविंद्र ब-हाटेला फरार मुदतीत रूमवर राहाण्यास आश्रय दिल्याप्रकरणी मस्के
याला अटक करण्यात आली आहे.