मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाचा कडेलोट महाराष्ट्राने अनुभवला. यावरून सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंना नको नको त्या उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवलाय.
आजच्या अग्रलेखात त्यांनी राणेंना 5 उपमा दिल्यात. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत त्यांनी राणेंवर प्रहार केलाय.त्यावर आता भाजपाने आपली पहिली प्रतिक्रिया देत या टीकेचा निषेध करत शिवसेनेवर सूडाचं राजकारण करण्याचा आरोप केलाय.
त्यावर आता भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि कारवाईचा निषेधही केला आहे. यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आपल्या हुजरेगिरीला बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत? असा प्रश्न ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारला आहे.
गोपीचंद पडळकर यांचे ट्विट
अतिमाननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा ‘तुमच्या हम करे सो कायद्याच्या’ फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील.@rautsanjay61@BJP4Maharashtra @ShivSena @SaamanaOnline pic.twitter.com/hPsWtHQ9f7
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 26, 2021