मुंबई – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य विधान केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान, नारायण राणे आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहे. रुटीन चेकअपसाठी ते रुग्णालयात गेल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नारायण राणे चर्चेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य विधान केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांना जामिनही मिळाला मात्र या दरम्यान त्यांचा रक्तदाब वाढला होता. शिवाय त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता.
दरम्यान, राणे यांची तब्बेत ठणठणीत असून लीलावती त्यांच्या प्रकृतीची डॉकटर तपासणी करत आहेत. ते उद्या जन आशिर्वाद यात्रेसाठी जाणार असल्याकारणाने आज रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेले आहेत.