बंगळुरु – देशात करोना सोबतच ब्लॅक फंगसने अनेकांना ग्रासले होते. करोना रुग्णांना ब्लॅक फंगसची सतत भीती असते. असे असताना या ब्लॅक फंगसच्या भीतीने एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कर्नाटकमध्ये घडली आहे.
ब्लॅक फंगस होईल या भीतीने जोडप्याने आत्मह्त्या केली आहे. रमेश गुणा, वय 40 व सुवर्णा गुणा, वय 35 असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
आत्महत्येपुर्वी दोघांनीही सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यामध्ये “माझ्या पत्नीला मधुमेह आहे, न्यूज चॅनल्सनी दाखवले आहे, त्यानुसार ज्या मधुमेही रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला, त्यांना ब्लॅक फंगसचा धोका आहे. त्यामुळे आपले अवयव गमावू शकतो. त्याची किंमत चुकवावी लागू शकते, त्यामुळे आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला”
आम्हांला करोनामुळे ब्लॅक फंगसची लागण झाल्यास आणि त्यामुळे एखादा अवयव निकामी झाल्यास त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील. त्यामुळे आम्ही जीवन संपवत आहोत. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शहराचे पोलीस आयुक्त एन.शशीकुमार यांना ऑडिओ मॅसेज करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती.
आमच्या मृत्यूनंतर शरण पंपवेल आणि सत्यजीत सुरथकल यांनी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे आमचे अंतिम संस्कार करावेत,अशी विनंती आम्ही त्यांना करत आहोत. त्यासाठी 1 लाख रुपये ठेवल्याचेही त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. घरातील वस्तू आमच्या आईवडिलांच्या उपयोगाच्या नसल्याने त्या वस्तू गरिबांना वाटण्यात याव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही या कृत्याबाबत घरमालकांची माफी मगत असल्याचेही त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.