ठाणे – ठाण्यातील कळवा येथे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. कळवा पूर्व येथील इंदिरानगरमधील मॉं काली चाळीतील सहा घरांवर ही दरड कोसळली आहे. ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या दुर्घटनेत सहा घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी, आरडीएमसी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेत या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कळवा पूर्व भागातील इंदिरानगरमधील मॉं काली चाळ येथील घरांवर दरड कोसळली.
यात सहा घरांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून जवळच्या घरांतील रहिवाशांना पत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी 20 ते 25 घरातील कुटुंबियांना गोलाई नगर येथील ठाणे महापालिका शाळेत हलवले आहे. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.