मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत. दरम्यान, हे विषय हाताळत असताना त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची गुरुवारी भेट घेतली. राऊतांची भेट घेतल्यानंतर त्यांनी खास ट्विटही केले.
‘संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते. त्यांच्या मार्गदर्शनाच्या नक्कीच लाभ होईल’, असे अमोल कोल्हे म्हणाले. सध्या राजधानी नवी दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. नेते मंडळींच्या गाठीभेटींचा कार्यक्रम जोरात सुरु आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब यांची भेट झाली.त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते.महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात ‘महाविकास आघाडी’ म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होइल. @rautsanjay61 pic.twitter.com/hZvziKUHhx
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 5, 2021
अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊतांची भेट घेतली. शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर कोल्हेंनी पहिल्यांदाच राऊत यांची वैयक्तिक भेट घेतली. ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब यांची भेट झाली. त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते. महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली.
मतदारसंघात ‘महाविकास आघाडी’ म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल’, असे ट्विट कोल्हेंनी भेटीनंतर केले.