बर्लिन – पेट्रोल आणि डिझेल या इंधनाची टंचाई आणि महागाई शिवाय या इंधनामुळे होत असणारे पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेऊन जर्मनीमध्ये आता ई हायवे तयार करण्यात आले आहेत या हायवे वरून ट्रक किंवा इतर वाहने चालवत असताना विद्युत तारा मधील विजेचा वापर इंधन म्हणून केले जाणार आहे.
ज्या प्रमाणे विजेचा वापर करून रेल्वे चालवल्या जातात त्याचप्रमाणे रस्त्यावरील विजेचा वापर करून हे ट्रक चालवले जाणार आहेत प्रायोगिक तत्वावर अशाप्रकारे पाच किलोमीटर लांबीचा एक इलेक्ट्रिक हायवे तयार करण्यात आला आहे फ्रँकफर्ट शहरा पाशी हा प्रयोग करण्यात येत आहे या पाच किलोमीटरच्या हायवेवर दररोज वीस मोठ्या ट्रक चा निरीक्षणे नोंदवली जात आहेत हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला तर सर्वत्रच हायवेवर अशाप्रकारे विजेचा वापर शक्य आहे.
का याचा विचार केला जाणार आहे ट्रक वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने या प्रयोगाचे स्वागत केले जात आहे हा प्रयोग जर प्रत्यक्षात आणायचा असेल तर हायवेवर सर्वत्र विजेचे खांब उभे करून तेथे विजेच्या तारा ओढावे लागतील जर्मनीत सुमारे चार हजार किलोमीटर लांबीचा हायवे असून असे हायवे तयार करण्यात आले.
तर जर्मनीतील 60 टक्के वाहतुकीचा प्रश्न निकालात निघणार आहे या प्रकारे एक किलोमीटर हायवे तयार करण्यासाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे त्यासाठी ट्रकमध्ये लावावी लागणारी यंत्रणा ही अतिशय सोपी आणि सुलभ असणार आहे देशमधील आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सिमेंस यांनी या प्रयोगासाठी पुढाकार घेतला आहे