मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले आहे. ती अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. “फुलपाखरू’नंतर ऋताचे चाहते तिच्या आगामी मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत.
झी मराठीवर नुकताच एका मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रेक्षक चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. या मालिकेत ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. “मन उडू उडू झालं’ असे या मालिकेचे नाव आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
ऋताने या मालिकेचा टिझर आणि प्रोमो शेअर करत चाहत्यांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना “कमिंग बॅक होम वाली फिलिंग’ असे म्हटले आहे. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मालिका करताना ऋताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
प्रोमो पाहून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ऋता या मालिकेत एक वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. तिचा प्रोमोमधील लुक पाहून फक्त मालिकेतला नायकच नाही तर तमाम महाराष्ट्राचं घायाळ झाला आहे यात शंकाच नाही.