पुणे – शहरात शुक्रवारी कोवॅक्सिनचे सात केंद्रांवर डोस मिळणार असून, त्यातील सहा केंद्रांवर एक हजार आणि एका केंद्रावर पाचशे डोसचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी कोविशील्ड मिळणार नाही.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना शुक्रवारी कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
9 जुलैला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
वेळही निश्चित
ज्यांना ऑफलाइन ऑन दी स्पॉट लस घ्यायची आहे त्यांना सकाळी 10 ते दुपारी तीन या वेळेत लस देण्यात येईल. तसेच ऑनलाइन बुकींग करून अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत लस देण्यात येईल.
-
- कोवॅक्सिनचे डोस मिळण्याची केंद्रे
- येरवडा- राजीव गांधी रुग्णालय
- कोथरूड- कै. जयाबाई सुतार दवाखाना
- कर्वेनगर- कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना
- गाडीखाना- कै. मालती काची दवाखाना
- महंमदवाडी- कै. दशरथ भानगिरे दवाखाना
- मंगळवारपेठ – कमला नेहरू रुग्णालय
- ससून सर्वोपचार रुग्णालय