पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे शुक्रवारी कोवॅक्सिन आणि कोविशील्ड दोन्ही लस उपलब्ध करून देण्यात आले असून, दोन्ही मिळून 192 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. कोविशील्ड लस ही 186 केंद्रांवर तर कोवॅक्सिन ही लस 6 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. कोवॅक्सिनचे प्रत्येक केंद्रांवर 300, तर कोविशील्डचे 100 डोस उपलब्ध असतील.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
6 मे पूर्वी कोविशील्डचा पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना शुक्रवारी 30 टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून तर 30 टक्के ऑन दी स्पॉट दुसरा डोस दिला जाईल. तर 2 जुलैला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्यांना शुक्रवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे मिळेल.