टोक्यो – एकीकडे मेरी कोम आणि मनु भाकरसारखे नामांकित खेळाडू निराशाजनक कामगिरी करत असताना टोक्यो ऑलिंपिक्समध्ये भारताला आणखी एक पदक मिळवण्याची खात्री दिली आहे ती बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने.
स्पर्धेच्या सातव्या दिवशी आज सकाळीलव्हलिना बोर्गोहेनने तिचा उपांत्यपूर्व सामना जिंकला. लव्हलिना बोर्गोहेनने चालू टोकियो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी महिलांच्या वेल्टर (64-69 किलो) च्या उपांत्यपूर्व फेरीत नियन-चिन चेनला पराभूत केले. या विजयामुळे भारताला किमान कांस्यपदक मिळण्याची खात्री झाली आहे.
शुक्रवारी दुपारच्या सत्रात धावपटू दुती चंद आणि शटर पीव्ही सिंधू हेदेखील आपले कौशल्य आजमावतील. दुती चांद 100 मीटर्स रेसमध्ये तर सिंधू बॅडमिंटनमध्ये आपली चमक दाखवण्याची आशा करण्यात येत आहे.
मात्र, बॉक्सर सिमरनजीत कौरला लवकर बाहेर पडण्याचा सामना करावा लागला. तो महिला लाईटवेट गटात (57-60 किलो) राऊंड ऑफ 16 मध्ये सिमरनजीत सुदापोर्न सीसोंडीविरुद्ध पराभूत झाली.