पुणे : चतुःश्रृंगी पोलीसांनी एम.एस.ई.बी.चे डिपी तोडून साहित्य चोरणाऱ्या गुन्हयातील आरोपीना पकडले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच एका कंपनीच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांना जेरबंद केले आहे.
चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये घडण्याऱ्या इतर गुन्हयामध्ये वाढ झाल्यामुळे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी आढावा घेवून गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता व दाखल गुन्हे उघडकीस आणणे करीता चतुःशृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत पथक तयार केले होते. त्याप्रमाणे तपास पथकातील अमंलदार प्रविण शिंदे व दत्ता गेंगजे हे मिटकॉन कॉलेज बालेवाडी भागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी महावितरणचे पोलवरील ट्रान्सफार्मर मधील तांब्याचे कॉईल चोरुन घेवून जात असताना मोहमद फारुख रोशन चौधरी ( रा. वसई,.मुळ उत्तरप्रदेश ) कृष्णबिहारी रामभरोसे यादव (रा.कल्याण, मुळ-नोबस्तान, पो.नारायणपुर, उत्तरप्रदेश) यांना त्यांचे अल्टो कारसह पकडले. त्यांचेकडून 2 लाख 17 हजार कि.रू चे तांब्याचे वायईडींग 160 किलो सह एक अल्टो कार असा माल हस्तगत करण्यात आला आहे.
त्यांनी पोलादपूर, भोईसर तसेच चतुः: श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले आहेत. तर पोलीस अंमलदार दिनेश गडाकुंश,आशिष निमसे यांना मिळालेल्या खबरीवरुन किरण नागेश विटकर ( रा.सोमेश्वर मंदिराजवळ,जनता वसाहत जनवाडी पुणे)यास ताब्यात घेवून त्याचेकडून गुन्हयातील एकूण 1 लाख 10 हजार 780 रुपयांचे दोन एसी व दोन जुने मायक्रोव्हेव हस्तगत करण्यात आले आहेत.
तसेच चतुःशृंगी पोलीस स्टेशन यु ब्रॉंड बॅड इंडिया प्रा.लि.बाणे पुणे यांचे इंटरनेट बॅटरी चोरीच्या गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस अमलदार प्रकाश आव्हाड यांना मिळालेल्या बातमीवरून टिकाराम दिगंबर नेमाडे (वाल्केकरवाडी पुणे.मुळ-जळगांव) याचा शोध घेवून त्याचेकडून गुन्हयातील 11 हजार च्या एकूण एचबीएल कंपनीच्या 26 एच पावरच्या एकूण 11 बॅटऱ्या हस्तगत केलेल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक महेश भोसले,मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार, मुकुंद तारू, ज्ञानेश्वर मुळे, श्रीकांत वाघयले, इरफान मोमीन, प्रमोद शिंदे, संतोष जाधव, सुधीर माने, पोशि अमोल जगताप व तेजस चोपडे यांच्या पथकाने केली आहे. सदर प्रकरणी पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले हे करीत आहेत.