नवी दिल्ली – आज लागोपाठ चौथ्या दिवशी देशातील रूग्ण संख्या एक लाखाच्या आत राहिली आहे. गेल्या चोवीस तासात देशातील रुग्णसंख्या 91 हजार 702 इतकी नोंदवली गेली आहे.
देशातील पॉझिटीव्हिटी रेटही 4.49 इतका खाली उतरला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान कोविडग्रस्तांच्या मृत्युचे प्रमाण मात्र अजूनही चिंताजनकच आहे. गेल्या 24 तासांत 3403 कोविडग्रस्तांचे निधन झाले.
रूग्ण दगावण्याचे प्रमाण 1.24 टक्के इतके झाले आहे. त्यामुळे देशातील एकूण कोविड मृतांचे प्रमाण 3 लाख 63 हजार 79 इतके झाले आहे. देशातील सक्रिय बाधितांची संख्याही आता 11 लाख 21 हजार 671 इतकी खाली आली आहे.