नवी दिल्ली – परकीयचलन व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याच्या कारणावरून ईडीने क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजला नोटीस जारी केली आहे. या एक्सचेंजने या नियमांचा भंग करून 2790 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
चीनी कंपनीच्या मदतीने हा बेकायदेशील ऑन लाईन बेकायदेशीर व्यवहार झाला आहे. ही व्यवहाराची रक्कम 2790 कोटी रुपयांची आहे. या व्यवहारात मनीलॉड्रिंगच्या नियमाचे अनेक प्रकारे उल्लंघन झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर फेमा अंतर्गत संबधितांना ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
या व्यवहारात गुंतलेली वझिर एक्स ही कंपनी कोणत्याही खातेदाराचे कोणतीही कागदपत्रे न तपासता किंवा संबंधीतांचे नागरिकत्वही न तपासता त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.