सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील होळ प्राथमिक केंद्रात दोन दिवसांत आलेली 200 लस शहरातील आयटी मुलांनी ऑनलाइन बुक केल्याने बारामती तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. नोंदणी डिजिटल तर आम्हाला लस कधी? असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.
पहिला डोस गावामध्ये घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु लस उपलब्ध होत नसल्याने दुसरा डोस घेण्याची वेळ आली. परंतु लस कमी प्रमाणात येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात लस ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. त्यामुळे आपल्याला दुसरा घ्यायचा यासाठी अनेकांनी केंद्राकडे धाव घेतली. वयवर्ष 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी पहिला डोस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली. सकाळी रांगा लावल्या.
परंतु ऑनलाइन नोंदणीमध्ये केंद्र निश्चित झाले नसल्याने लस मिळणार नाही, याची खात्री तरूणवर्गास सह इतरांना केंद्रावर गेल्यावर समजले. ग्रामीण भागात अनेकांना नोंदणी करण्याची पद्धत माहीत नाही. त्यामुळे लस घेण्यापासून दूर राहत आहेत. यात बदल करून साधी पद्धत करावी.लसीची उपलब्धता सुद्धा अधिक हवी, असे मत ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड यांनी व्यक्त केले.