देशभरात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून अनेक सेलिब्रिटीजनाही त्याची लागण झाली आहे. या करोनाशी काही कलाकार लढा देत आहेत, तर काही जणांनी त्यावर यशस्वीपणे मात केली आहे.
या सेलिब्रिटींनी आपले काही अनुभवही चाहत्यांशी शेअर करत आपल्या परीने काही मदतदेखील केली आहे. अशाच सेलिब्रिटींमध्ये आता मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटच्या नावाचा समावेश झाला आहे.
प्रिया बापटने करोनातून बरं झाल्यानंतर एक महत्त्वाचे आणि मोठे काम केले आहे. विशेष म्हणजे, तिच्या आयुष्यात तिने पहिल्यांदाच असे काम केले आहे. करोनातून बऱ्या झालेल्या प्रिया बापटने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
तिची ही पोस्ट सध्या खूपच चर्चेत आहे. कारण तिला आयुष्यात जे आजवर जमलं नाही ते तिने करोनातून बरं झाल्यानंतर केले आहे. यामुळे आता आपल्याला शांत झोप लागणार असल्याचे तिने म्हटले आहे.
याबाबत प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मोठी पोस्ट लिहिली आहे. प्रिया म्हणाली, करोनातून बरं झाल्यानंतर अखेर आपल्याला रक्तदान करता आले. समाजाला काहीतरी देण्याची ही संधी मला सोडायची नव्हती, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.