नवी दिल्ली – करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जागतिक आर्थिक परिस्थितीबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढू लागली आहे. परिणामी सोन्याच्या दरात या आठवड्यात बरीच वाढ झाली.
गुरुवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 182 रुपयांनी वाढून 45,975 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा दर 725 रुपयांनी वाढून 66,175 रुपये प्रतिकिलो झाला. दिल्ली सराफात कालही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती.
या घटनाक्रमाबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज् या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक वायदे बाजारामध्ये सोने आणि चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या प्रमाणात स्पॉट मार्केटमध्येही सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.