अनुष्काची ‘ती’ कृती पाहून विराट झाला थक्‍क!

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती चक्‍क आपला पती विराट कोहलीला उचलताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्माने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. पोस्ट डिलिव्हरी कालावधीत तिने फिटनेसवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. जानेवारीत आई झाल्यानंतर तिने 2 महिन्यांचा ब्रेक घेतला. आता तिने तिची कामे सुरू केली आहे. तिचे सध्याचे रूप पाहून फॅन्स आश्‍चर्य व्यक्‍त करीत आहेत.

नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यात ती पती विराट कोहलीला उचलून घेताना दिसत आहे. अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या या व्हिडिओत विराट कोहली कोणाबरोबर तरी बोलताना दिसत आहे.

यावेळी त्याच्या पाठीमागे अनुष्का उभी असून, पाठीमागून ती त्याला उचलण्याचा प्रयत्न करीत आहे. अनुष्काला असे करताना पाहून तो आश्‍चर्य व्यक्‍त करीत असून, यावेळी त्याच्या तोंडातून अनपेक्षितपणे ओह…तेरी… दोबारा करना, असे उच्चार ऐकू येतात.

यानंतर अनुष्का विराटला पाठीमागे झुकण्यास प्रतिबंध करीत असून, त्याने असे करू नये यासाठी त्याच्याकडे वचन मागत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा विराटला आपल्या कवेत घट्ट पकडून उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.