पालिका समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक
पुणे – महापालिकेच्या चार विशेष समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपसह, महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्यात आले. या समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 7 एप्रीलला ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार, या चारही समित्यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद भाजपकडे असल्याने ही निवडणूक केवळ औपचारीकता असणार आहे.
अशा आहेत समित्या आणि अर्ज दाखल केलेले उमेदवार
विधी समिती अध्यक्षपदाचे उमेदवार : बापूराव कर्णे गुरूजी (भाजप), युवराज बेलदरे (राष्ट्रवादी)
उपाध्यक्ष : संदीप जऱ्हाड (भाजप), विधाल धनावडे (शिवसेना)
शहर सुधारणा समिती अध्यक्ष : आनंद रिठे (भाजप), वनराज आंदेकर (राष्ट्रवादी)
उपाध्यक्ष : उमेश गायकवाड (भाजप), संगील ठोसर (शिवसेना)
महिला बालकल्याण समिती अध्यक्ष : रुपाली धाडवे (भाजप), श्वेता चव्हाण (शिवसेना)
उपाध्यक्षपद : अर्चना मुसळे (भाजप) वैशाली मराठे (कॉंग्रेस)
क्रीडा समिती समिती अध्यक्षपद – अजय खेडेकर (भाजप), रफिक शेख (कॉंग्रेस)
उपाध्यक्षपदासाठी – ज्योती कळमकर (भाजप),ऍड. भैय्यासाहेब जाधव (राष्ट्रवादी)