“फिल्मफेयर अवॉर्ड-2021’ची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यात बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी पूजा बेदीची मुलगी अलाया एफनेही वर्णी लावली आहे. अलाया एफला तिच्या पहिल्या “जवानी जानेमन’साठी बेस्ट फीमेल डेब्यू पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याने अलाया खूपच आनंदी आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या अलायाने हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपला आनंद चाहत्यांशी शेअर केला आहे. या अवॉर्डसही तिने फोटो क्लिक करत जबरदस्त डान्स केला आहे. अलायाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती ट्रॉफीसह डान्स करताना दिसत आहे.
यापूर्वी तिने हा पुरस्कार स्वीकारतानाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोत ती पुरस्कार मिळाल्याने खूपच आनंदी असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर अलायाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या कामगिरीबद्दल चाहत्यांकडून तिला शुभेच्छाही मिळत आहे.
दरम्यान, अलायाने गतवर्षी “जवानी जानेमन’मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. या चित्रपटात तिने सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. यातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले होते.