मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री क्वीन’ कंगना राणावत काही वर्षांत आपल्या जबरदस्त अभिनयाने सतत प्रसिद्धी मिळवित आहे. एवढेच नव्हे, तर तिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. बॉलिवूडच्या पंगा क्वीन कंगना राणावतचा हिचा आज वाढदिवस.यातच कालच कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या आनंदात कंगनाने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.
They said a woman has a shelf life, this world only values young sweet 16 type girls with no brains,mature and wise woman can only belong to a household to a man who can give them a surname.They said many things it made me anxious, what will happen to me, where will I go (cont) pic.twitter.com/M3qrgqGaDF
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 23, 2021
जणू मी असामान्य क्षमता असलेली सुपरह्युमन असल्याचे मला वाटतेय, असे तिने ट्विटरवर स्वत:चा एक फोटो शेअर करत लिहिले आहे. सध्या तिने केलेल्या ट्विटमुळे सोशावर काही नेटकरी तिला शुभेच्छा देतांना दिसत आहे तर काही तिच्या ट्विटची खिल्ली उडवितांना दिसत आहे.
कंगना राणावत आज 34 वा वाढदिवस साजरा करतेय. तिने यानिमित्याने ट्विट केले आहे की,’लोक म्हणतात की, महिलांचे एक वय असते, हे जग केवळ बिनडोक गोड 16 टाईप मुलींना महत्त्व देते. समजुतदार व बुद्धिमान महिला केवळ एखाद्या पुरूषाचे घर सांभाळू शकतात. ते अशा अनेक गोष्टी बोलायचे आणि त्या गोष्टी मला त्रास द्यायच्या. माझे काय होणार, मी कुठे जाऊ? असे प्रश्न मला पडायचे.
मात्र आज मी ३४ वर्षांची झाली असून, मी करिअरच्या शिखरावर असेन, हे त्यांनी मला कधीच सांगितले नाही. मी आज जे आहे ते माझ्या कलेमुळे आहे. ३४ वर्षी माझे अनुभव मला महत्वाचे ठरतील, यावेळी माझे वय वा माझी वैवाहिक स्थिती याला काहीही महत्त्व उरणार नाही, हे त्यांनी कधीच सांगितले नाही.\
आज मी सुपर ह्युमन आहे, असे मला वाटतेय. मला मुळीच फरक पडत नाही की, मी जाड आहे की सडपातळ याने मला काहीही फरक पडत नाही. मादक दिसणे मला आवडते आणि माझ्या सेक्शुअॅलिटीबद्दल मी सहज आहे…मी सर्व मुलींना सांगू इच्छिते की, 34 व्या वर्षी मी आनंदी आहे आणि जग सुंदर भासतेय. मला जन्म देणाºया आईचे आभार…, असे कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.