पुणे – कसोटी पाठोपाठ टी-20 सामन्यांची मालिका जिंकलेल्या भारतीय संघाचा आज येथील गहुंजे मैदानावर इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतही विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला सातत्य कायम राखावे लागणार आहे.
दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टॉस) कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. ( England win the toss and elect to field )
कर्णधार इयान माँर्गनने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिर पांड्या, कृणाल पांड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंड संघ – इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, जॉस बटलर, सॅम बिलिंग्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद आणि मार्क वुड