मंचर -आंबेगाव तालुक्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयात करोना प्रतिबंधक लसीकरण कोव्हॅक्सिन या लसीद्वारे सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने यांनी दिली.
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे लसीकरण आठवडा वेळापत्रकाप्रमाणे केले जाणार आहे. त्यामध्ये कोव्हॅक्सिन (प्रथम व दुसरा डोस) सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि कोविशिल्ड (फक्त दुसरा डोस) बुधवारी देण्यात येणार आहे.
कोव्हॅक्सिन लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असून, करोना आजाराच्या प्रतिबंधासाठी कवच म्हणून काम करणार आहे. कोव्हॅक्सिन प्रथम कोव्हिड योद्धे, ज्येष्ठ नागरिक, तसेच 45 वर्षापुढील अतिजोखमीच्या व्यक्ती यांना देण्यात येणार आहे.नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. देवमाने यांनी केले आहे.