अमरावती – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाची रूग्णसंख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अमरावतीत आठवडाभरासाठी कडक लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यात अनलाॅकनंतर पहिला लाॅकडाऊन हा अमरावतीत जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी 8 वाजल्यापासून अमरावती शहर, अचलपूर शहरात लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार आहे. याबाबतची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दुपारी 4 वाजता केलीय.
अमरावती जिल्हा तसेच शहरामध्ये गत काही दिवसांपासुन कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महानगर पालिका , आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या लक्ष केंद्रित करुन कार्यवाही करावी. pic.twitter.com/3SD0qwsT0z
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 21, 2021
‘सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे लाॅकडाऊन जाहीर केला आहे. अमरावतीकरांनी याचं पालन करावं. नाईलाजास्तव केवळ अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवावी लागणार आहे. इतर सर्वकाही बंद असणार आहे. तसेच शहरातील बाजार हे गाईडलाइन्सनुसारच सुरू राहतील’, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.