-->

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आठवडाभरासाठी कडक लाॅकडाऊनची घोषणा; अनलाॅकनंतर पहिला लाॅकडाऊन

अमरावती – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाची रूग्णसंख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अमरावतीत आठवडाभरासाठी कडक लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यात अनलाॅकनंतर पहिला लाॅकडाऊन हा अमरावतीत जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी 8 वाजल्यापासून अमरावती शहर, अचलपूर शहरात लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार आहे. याबाबतची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दुपारी 4 वाजता केलीय.

‘सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे लाॅकडाऊन जाहीर केला आहे. अमरावतीकरांनी याचं पालन करावं. नाईलाजास्तव केवळ अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवावी लागणार आहे. इतर सर्वकाही बंद असणार आहे. तसेच शहरातील बाजार हे गाईडलाइन्सनुसारच सुरू राहतील’, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.