नवी दिल्ली: मागच्या काही दिवसांपासून देशात इंधन आणि गॅस सिलेंडरची रोज थोड्याफार प्रमाणात दरवाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ सुरूच आहे. काल ब्रेन्ट क्रूड तेलाने प्रति बॅरल 61 डॉलरचा टप्पा ओलांडला. त्यामुळे देशांतर्गत बाजारात आज दोन्ही इंधन महागले आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांमध्ये 30 आणि 25 पैसे प्रतिलिटर वाढ केली. काल या इंधनात प्रति लिटर 35 ते 35 पैशांची वाढ झाली होती. दिल्लीत बुधवारी पेट्रोल प्रति लिटर 87.60 रुपये तर डिझेल 77.73 रुपयांवर गेले.
नवीन वर्ष पेट्रोलियम इंधनासाठी चांगले राहिलेले नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल फक्त 14 दिवसांत महाग झाले, परंतु आता ते 03.89 रुपयांनी महाग झाले. मुंबईत पेट्रोलचे दर 94 रुपयांवर गेले आहेत, जे मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक आहे. जवळजवळ सर्व शहरांमध्ये पेट्रोल दर भडकलेले आहेत. यापूर्वी मागील वर्षाच्या उत्तरार्धातही पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. जर पाहायला गेल्यास 10 महिन्यांत त्याची किंमत प्रति लिटर 18 रुपयांनी वाढली.
पेट्रोलसह डिझेलची किंमतही रेकॉर्ड स्तरावर आहे. काल डिझेल 35 पैशांनी महागले. आज पुन्हा डिझेल 25 पैशांनी महाग झाले. नवीन वर्षाच्या 14 दिवसांदरम्यानच डिझेल प्रतिलिटर 03.86 रुपयांनी महाग झाले. जर पाहायला गेल्यास 10 महिन्यांतच त्याची किंमत 15 रुपयांपेक्षा जास्त वाढली.