दार ए सलाम – संपूर्ण जग करोना विषाणूमुळे पसरलेल्या कोव्हिड-19 च्या दुष्टचक्रातून बाहेर पडत असतानाच टांझानियात एक गूढ आजाराचा फैलाव झाला आहे. या आजारात पीडितांना रक्ताच्या उलट्या होतात. या आजारामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण बाधित आहेत. मात्र, हा आजार संसर्गजन्य आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, टांझानिया सरकारने या आजाराचा खुलासा करणाऱ्या चुन्या जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी फेलिस्ता किसांदू यांना निलंबित केले आहे. किसांदू यांनी म्हटले होते की, संसर्गाच्या तपासणीसाठी रुग्णांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मात्र, उद्रेकाचे संकेत नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भीती निर्माण केल्याने किसांदू यांना निलंबित केल्याचेही सांगण्यात आले.