बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना बऱ्याच वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र, ट्विंकल नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. ती चाहत्यांसाठी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच ट्विंकलने तिच्या मुलीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिची मुलगी नितारा गिटार वाजवताना “ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’ हे गाणे म्हणत आहे.
View this post on Instagram
ट्विंकलने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ती माझ्यासाठी हे गाणे म्हणत आहे, मात्र, या व्हिडीओमध्ये ट्विंकलच्या लेकीचा चेहरा दिसत नाही. ट्विंकल तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. एकदा, तिने एका मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या मुलांना माझे रोमॅंटिक चित्रपट बघू देत नाही. जेव्हा माझा मुलगा माझाच रोमॅंटिक चित्रपट पाहतो तेव्हा मला लाज वाटते. ट्विंकल म्हणाली होती की, आरव खूप खोडकर आहे. माझ्या जुन्या रोमॅंटिक सीनचा व्हिडिओ तो वारंवार पाहतो आणि माझी खिल्ली उडवतो.
View this post on Instagram
दरम्यान, ट्विंकलने 1995 मध्ये “बरसात’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. ट्विंकलने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत 17 चित्रपट केले आहेत. 2001 मध्ये अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकलने आपल्या चित्रपटाच्या प्रवासाला निरोप दिला. अभिनयाला निरोप दिल्यानंतर ट्विंकलने लिखाणाच्या जगात प्रवेश केला. तिने बरीच पुस्तके लिहिली आहेत.