चंद्रभागा गोशाळेचा उपक्रम
चिखली – भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी विवाह सोहळ्यात गोदान करण्याची पद्धती होती. परंतु पारंपरिक पद्धतींना व शास्त्राला बाजूला सारत आपण पैसे, वस्तू अथवा कांचन दान करण्यावर भर देऊ लागलो. परंतु जागतिकीकरणातही पुन्हा संस्कृती रुजविण्यासाठी वाकड येथील बर्ड व्हॅली येथे झालेल्या विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्याला “गो’दान करण्यात आले आहे.
चंद्रभागा गोशाळेच्या वतीने गोरक्षक ऍड. चिरंजीव मंगेश नढे व चि. सौ. का. शिवानी यांना कामधेनू काळी कपिला गाय दान करण्यात आली. नव दाम्पत्याने मोठ्या आनंदाने गायीचा स्वीकार केला. अखिल भारत कृषी गोसेवा संघ अध्यक्ष मिलिंद एकबोटे व मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वीमी यांच्या हस्ते नव वधुवरांना गोदान करण्यात आले.
या वेळी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, संदीप वाघिरे, नाना काटे, आदर्श गोसेवक रामकृष्ण लांडगे, धनंजय गावडे, नीलेश चास्कर, अभिजित शिंदे, नीलेश देशमुख व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.