श्रीनगर : जम्मूच्या सांबा भागात बीएसएफच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानी घुसखोराचा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी डाव उधळून लावला आहे. बीएसएफच्या गोळीबारात एका पाकिस्तानी घुसखोराचा मृत्यू झाला आहे. भारतीय जवानांनी त्याचे प्रेत ताब्यात घेतले असून त्याच्याबाबत तपास सुरु केला आहे.
बीएसएफच्या जवानांनी जम्मूच्या सांबा सेक्टरमधील बीओपी चक फकीरा क्षेत्रात बीपी नंबर 64 च्या जवळ या घुसखोराला मारले आहे. अनेकदा आवाहन करुनही तो घुसखोर बीएसएफला प्रतिसाद देत नव्हता. तशाही परिस्थितीत तो घुसखोर संशयास्पद वर्तवणूक करत असल्याचे दिसल्याने त्याला ठार मारण्यात आले.
सकाळी 9.45 मिनीटांच्या सुमारास बीएसएफच्या जवानांना बीपी नंबर 64 च्या जवळ एक घुसखोराची संशयास्पद हालचाल होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बीएसएफने त्या घुसखोराला शरण येण्यास वारंवार सांगितल्यानंतरही त्या घुसखोराची संशयास्पद हालचाली सुरुच होत्या. नंतर त्या घुसखोराना बीएसएफच्या जवानांवर गोळीबार केला. त्यामुळे बीएसएफच्या जवानांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्याला ठार केले.
आता या घुसखोराचे प्रेत ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे काही सापडते का हेही पाहण्यात येतंय. तसेच हा घुसखोर कोणत्या मार्गाने आला होता, त्याचे नियोजन काय होते याचाही तपास सुरु आहे.