आबुधाबी – आबुधाबीत सध्या टी-10 लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आबुधाबी व नॉर्दर्न वॉरिअर्स यांच्यात झालेल्या सामन्यात वॉरिअर्सकडून खेळणारा रोहन मुस्तफा सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना एक चेंडू त्याच्याकडे आला. मात्र, सामना सुरू असताना तो आपल्या अंगातील टी-शर्ट बदलत होता व त्यामुळे त्याला चेंडू अडवता आला नाही व चौकार गेला.
Team Abu Dhabi versus Northern Warriors earlier today in the T10 League – the ball goes for 4 as the fielder Rohan Mustafa was too busy changing his jersey #T10League #Cricket pic.twitter.com/GvHZMhl2eq
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) February 1, 2021
फलंदाजाने जेव्हा फटका मारला तेव्हा मुस्तफो चेंडू पकडण्याऐवजी स्वत:चा टी शर्ट बदलत होता. त्यामुळे चेंडू त्याच्या जवळून गेला तरीही त्याला तो पकडता आला नाही. यामुळे आबुधाबी संघाला चौकार मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात वासिम महंमदने केलेल्या 76 धावांच्या जोरावर नॉर्दर्न वॉरियर्सने 8 गडी राखून विजय मिळवला. आबुधाबीने 10 षटकात 3 बाद 123 धावा केल्या होत्या.