रांची – मैदानात खेळत असताना झालेल्या बॉम्बस्फोटात तीन शाळकरी मुलं जखमी झाली. शाळेजवळच्या मोकळ्या जागेत बॉल समजून काही शाळकरी मुलं चक्क बॉम्बशी खेळत होती आणि ही दुर्घटना घडली.
एका मुलानं बॉल समजून चक्क बॉम्ब दगडावर आपटला आणि सगळा परिसर बॉम्बस्फोटानं हादरून गेला. या दुर्घटनेत विवेक तूरी, दिनेश हाडी आणि बादल हाडी ही तीन शाळकरी मुलं जखमी झाली.
त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी विवेकची प्रकृती गंभीर आहे. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.