पुणे – शहरात पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने संयुक्तिक कोंबिंग ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगार व अवैध्य धंद्यांवर धडक कारवाई केली आहे. यामध्ये जुगार कायदयानूसार 63 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल दोन लाखाचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी परिमंडळीय पोलीस उप आयुक्त व पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांना गुन्हेगारांना चेक करुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 ते 5 व पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी सहभाग घेतला. तसेच पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने अधिकारी व अंमलदार यांची पथके स्थापन करुन पुणे शहरातील वेगवेगळ्या परिसरात गुरुवारी रात्री धडक कारवाई केली.
आरोपी चेकींग अभियानमध्ये परिमंडळ निहाय पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने एकुण 2036 गुन्हेगार चेक केले असुन त्यापैकी 705 गुन्हेगार मिळुन आले आहेत. प्रतिबंधक कारवाईच्या एकुण 480 केसेस करुन 466 आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन एकुण रु. 46550/- चा माल जप्त करण्यात आला आहे.
आर्मस ऍक्ट प्रमाणे एक केस करुन एका आरोपीस अटक केले. त्याचे ताब्यातुन 1 गावठी पिस्टल व दोन काडतूसे जप्त करण्यात आली. तसेच एकुण 23 केस करुन 23 आरोपीस अटक करुन त्याचे ताब्यातुन 22 कोयते व 1 पालघनचा जप्त करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे 4 तडीपार इसमांना तडीपार आदेशाचा भंग करुन पुणे शहरात वास्तव करीत असल्याचे मिळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे संशयित फिरणाऱ्या 19 इसमांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाने फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत बुधवार पेठ येथील जुनी सागर, नवीन सागर, नवीन बिल्डींग या 3 इमारती मधील खोल्यांच्या तपासणी केली असता त्यामध्ये एकुण 67 प्रौढ महिला मिळुन आल्या. सागर बिल्डींग मध्ये एक बांगलादेशी महिला मिळुन आली असता तिला ताब्यात घेऊन रेस्क्यु होम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरेगाव पार्क येथील मसाज सेंटर च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणा-या मिस्टेक स्पा मसाज सेंटरवर छापा टाकुन चार पीडित महिलांना संरक्षण कामी ताब्यात घेऊन सदर वेश्याव्यवसाय करुन घेणार महिला हिचे विरुध्द कोरेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारावाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आदेशान्वये पोलीस सहआयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.