नवी दिल्ली – अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तेथील संस्कृतीत सर्रास चालत असल्यामुळे परदेशात बोल्ड कंटेट मोठ्या प्रमाणात तयार केला जातो. मात्र यावरून अनेकदा वाद होतात. विशेष करून जोडप्यांमध्ये असे वाद अधिक वाढले आहे. ब्राझिलमध्ये एका व्यक्तीने पत्नीवर 14 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत:वर देखील गोळी चालवली. बोल्ड कंटेन्ट याचे कारण असल्याचे समोर आले आहे.
पत्नी बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असल्याने संतापलेल्या पतीने तिला गोळ्या घालून नंतर आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. 35 वर्षाच्या एलेन फेरेरा सियोलीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह होती. ती तिचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा शेअर करायची. तिचा पती एलेजांद्रो एंटोनियो एग्युलेरा याला फेरेराचं असं वागणं बिलकूल आवडत नव्हतं.
स्थानिक रिपोर्टनुसार एंटोनियो आणि फेरेरा यांच्या एका टिकटॉक व्हिडिओवरून बरेच वाद झाले. त्यानंतर चिडलेल्या एंटोनियो याने फेरेरावर 14 गोळ्या झाडल्या. नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेवेळी त्यांची 6 वर्षांची मुलगी देखील तिथे उपस्थित होती.
या दोघांचा मृतदेह ब्राझिलच्या पोंता पोरा येथे एका घराच्या मागच्या भागात आढळले. फेरेराच्या शरीरावर 14 जखमा होत्या. तिचा उजवा हात देखील तुटला होता. तर पतीच्या डोक्यात गोळी लागलेली होती. फेरेरा हिचे टिकटॉकवर 58 हजार फॉलोअर्स होते. ती आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.