पुणे – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सिरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी देखील या वृत्तास ट्विटरद्वारे दुजोरा दिला आहे.
प्रतिक पाष्टे (डेक्कन, पुणे) महेंद्र इंगळे ( नऱ्हे, पुणे), रमा शंकर हरिजन (उत्तर प्रदेश), बिपीन सरोज (उत्तर प्रदेश), सुशिल कुमार पांडे ( बिहार) अशी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.
We have just received some distressing updates; upon further investigation we have learnt that there has unfortunately been some loss of life at the incident. We are deeply saddened and offer our deepest condolences to the family members of the departed.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 21, 2021
मृत्यू झालेले बांधकाम मजूर असण्याची शक्यता आहे. आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरू होते. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सागितले.
Updated News : सिरम इन्स्टिट्यूट ‘अग्नितांडव’ ; तब्बल 4 तासांनी आग ‘आटोक्यात’
मांजरी बुद्रुक येथे सिरम इन्स्टिट्युट कंपनीचे सेझ युनिट आहे. त्यातील एका इमारतीला आग लागली होती. इमारतीच्या एका बाजून बंबांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीची तीव्रत इतकी होती की, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारेल तरी काही वेळाने पुन्हा तेवढ्याच ताकदीने पुन्हा आगीच्या ज्वाळा भडकत होत्या. मात्र, अखेर चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, दुर्दैवाने आगीत पाच जणांना जीव गमवावा लागला आहे.
सिरम इन्स्टिट्यूट अग्नितांडव : दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश – अजित पवार
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे.
Breaking News : पुण्यातील करोना लस बनविणाऱ्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला आग