पिंपरी – गरोदर महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी मोशी येथे घडली.
सुदर्शन चंद्रकांत संकपाळ (वय 26, रा. मोशी प्राधिकरण) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने बुधवारी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी प्राधिकरण येथील एका सोसायटीमध्ये घडला. पीडित महिला तिच्या घरी दुपारच्या वेळी जेवणाचा डबा आणण्यासाठी गेली. त्या वेळी आरोपी बेकायदेशीरपणे तिच्या घरात आला. महिलेचा हात धरून तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत त्याने गैरवर्तन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.