नवी दिल्ली – सरकारने येत्या 26 जानेवारी पर्यंत नागरीकांना लाल किल्ला परिसरात प्रवेश करण्यास बंदी केली आहे. या परिसरात काहीं दिवसांपुर्वी पंधरा कावळे मृतावस्थेत आढळले होते, त्यांचे अवषेश तपासणीसाठी जालंधरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.
त्यात त्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्युमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या भागात विषाणुंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने त्या भागात प्रवेश करण्यास नागरीकांना बंदी घालण्यात आली आहे. केवळ दक्षतेचा उपाय म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे अशी माहिती दिल्ली सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
शनिवारी दिल्ली प्राणी संग्रहालयातील काही प्राण्यांच्या रक्ताचे नमूनेही एव्हीन इनफ्ल्युएंजा सदोष आढळले आहेत. दिल्लीत बर्ड फ्ल्यु सारखे आजार पसरू नयेत म्हणून दिल्ली सरकारने गेल्याच आठवड्यात दिल्ली बाहेरून चिकन आणण्यास प्रतिबंध लागू केले आहेत. दिल्ली महापालिकेने चिकन किंवा चिकनचे पदार्थ आपल्या हद्दीत विकण्यास बंदी लागू केली आहे.