मेष : व्यवसायात कामात आलेल्या अडथळ्यांना पार करून वेळप्रसंगी धोका पत्करून पुढे जाण्याचा प्रयत्न राहील.
वृषभ : योग्य व्यक्तिंची भेट घेऊन कामे मिळवाल व कामे मार्गी लागतील. घरात वातावरण चांगले राहील.
मिथुन : व्यवसायात समोर मिळालेल्या संधीचा जास्त लाभ घ्या. कलाकार, खेळाडूंना त्यांचे क्षेत्रात मागणी राहील.
कर्क : नको त्या कामात बराच वेळ जाईल. सरकारी कामे वेळ घेतील. पैशाच्या कामांना गती येईल.
सिंह : बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणे भाग पडेल.
कन्या : व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. नवीन कामे मिळतील.
तूळ : कार्यपद्धतीत बदल करून नवीन तंत्रज्ञान आत्मसात कराल. नोकरीत कामाच्या स्वरूपात फेरफार होईल.
वृश्चिक : व्यवसायात पैशाची स्थिती जरी समाधानकारक असली तरी देणी व इतर खर्च वाढतील.
धनु : नवीन कामाच्या योजना सुरू करण्याचा इरादा सफल होईल. कामे वाढवण्याच्या दृष्टीने करार मदार होतील.
मकर : व्यवसायात पैशासाठी धावपळ दगदग होईल. हातातील पैशाचा वापर विचारपूर्वक करावा लागेल.
कुंभ : कधी गोड बोलून तर कधी अधिकाराचा वापर करून कामे करून घ्याल. कमाई समाधानकारक राहील.
मीन : व्यवसायात चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. मनातील गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्याचा आग्रह राहील.