लंडन – गोलंदाजांनाही आता फलंदाजाच्या आक्रमक फलंदाजीमुळे दुखापत होऊ नये यासाठीदेखील हेल्मेट उपलब्ध झाले असून लवकरच विविध गोलंदाज याचा वापर करतील, असा विश्वास आयसीसीने व्यक्त केला आहे.
वेगवान फलंदाजी करताना तसेच मर्यादित षटकांच्या सामन्यात फलंदाज आक्रमकतेने खेळ करतात. त्यातही अनेकदा फलंदाज स्ट्रेट ड्राईव्ह किंवा रिटर्न शॉटही खेळतात व त्यावेळी केवळ पंच नव्हे तर गोलंदाजही जखमी होण्याचा धोका असतो.
पुढील वर्षी टी-20 सामन्यांत या हेल्मेटचा वापर होताना दिसेल. यासाठी यार्कशायरचा वेगवान गालंदाज बेन कार्डने गोलंदाजांना सहज वापरता येईल, असे खास हेल्मेट तयार केले. त्याने स्वत: याचे डिझाइन केले. त्यामुळे आता हे गोलंदाजांना वापरता येईल. सध्या हे हेल्मेट घालून गोलंदाजी करण्याचा प्रयोग न्यूझीलंडमध्ये सुरू आहे. येथील गोलंदाज हे देशांतर्गत स्पर्धेत हेल्मेटचा वापर करताना दिसतात.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज कॅमरून ग्रीनला भारत अ संघाविरुद्ध सराव सामन्यादरम्यान बुमराहने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह थेट तोंडावर लागला होता. त्याची दुखापत गंभीर नव्हती मात्र, त्यामुळेच आता गोलंदाजांसाठीही खास प्रकारचे हेल्मेट उपलब्ध झाले पाहिजे असे म्हटले जात होते.