मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ नेहमीच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. जरी दिशा पटानी नेहमीच टायगर श्रॉफला तिचा एक चांगला मित्र म्हणून वर्णन करत असली तरी ते दोघे नेहमीच एकत्र पहायला मिळतात. यातच तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा एकदा बॉलीवूडचे लव्ह बर्ड चर्चेत आले आहे.
View this post on Instagram
या फोटोमध्ये दिशा पिंक ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोत तिने लुई विंतोची बॅग घेतली आहे. टायगर श्रॉफने दिशाच्या या फोटोला लाइक केले आहेत. तिचे चाहते ब्युटीफूल, गॉर्जस आणि हॉट अशी कमेंट्स करत आहेत. या फोटोला आतापर्यंत १८ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत आहेत.
View this post on Instagram
यापूर्वीही तिने टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत असल्यामुळे चर्चेत आली होती. दिशा आणि टायगरला मालदीवमध्ये एकत्र पाहून अनेक जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दिशा पटानी शेवटची मलंग चित्रपटात दिसली होती. आता ती ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’मध्ये दिसणार आहे.यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी भेटीला येणार आहे. तर टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याच्याकडे बरेच प्रोजेक्ट्स आहेत ज्यात बागी ४, हिरोपंती २, रैम्बो आणि गणपत यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.