पुणे(प्रतिनिधी) – शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे होणारी वाहतुकीची कोंडी व वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने ग्रीन पुणेसाठी स्थायी समिती ठराव क्र. 315,दि. 14/02/2020 अन्वये विट्रो मोटर्स इलेकट्रीक बाईक रेटींग प्रोजेक्ट राबविण्यास स्थायी समितीची मान्यता मिळालेली आहे.
सदर प्रस्ताव शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून विट्रो मोटर्स प्रा. लि. या कंपनीने मांडला होता. या प्रस्तावामध्ये पुणे शहारामधील मुख्य रस्त्यावरील 500 ठिकाणी 2000 चार्जिंग पॉंइंटस् उभारण्याचे नियोजन असुन शहरामध्ये सुरवातीच्या टप्प्यांमध्ये 3000 हजार ते 5000 हजार इ-दुचाकी वापरात आण्यायची संकल्पना आहे.
महत्वाचे म्हणजे संपुर्ण देशामध्ये सार्वजनिक दुचाकी इलेक्ट्रीक वाहतुक सेवा देणारे पुणे शहर हे प्रथम शहर ठरणार आहे. अंतिम मान्यतेनंतर तीन महिन्यानंतर हा प्रकल्प पुणेकरांसाठी तयार असेल.
सदर प्रकल्पासाठी सर्व गुंतवणुक विट्रो मोटर्स प्रा.लि. कंपनी करणार असुन पुणे महानगरपालिकेची शुन्य अर्थिक गुंतवणुक असणार आहे.
ग्रीन पुणेसाठी इलेक्ट्रीक –बाईक रेटींग प्रोजेक्ट ही संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येणार असुन या इलेक्ट्रीक बाईकने प्रवास करण्यासाठी नागरिकांना खालीलप्रमाणे खर्च येणार आहे.
Rental | Charges | Km. | Avg. Charge/Km. |
Monthly | 3800/- | 4000 | 0.95 |
Weekly | 1900/- | 1000 | 1.9 |
Daily | 450/- | 150 | 3 |
Hourly | 100/- | 25 | 4 |
Per Km. | 4/- | 1 | 4 |